आय सी सी क्लबच्या सदस्यांची पुणे – पंढरपूर – पुणे सायकल वारी


एमपीसी न्यूज – हडपसर मधील सायकलिस्ट ला  शनिवारी १७ जूनला सकाळी ४ वाजता आकुर्डी येथून ८ जण हडपसर चा दिशेने निघालो व ५ वाजता मगर पट्टा  ब्रिज खाली ठरल्या प्रमाणे आले होते त्यानुसार १२ जण तिथे आले होते . सगळ्याची भेटी आणि ओळख करून सकाळी ५.१० ला पांढुरंगाच्या वाटेने प्रवास सुरु झाला. मगरपट्टा चौक ते चौफुला ५० किलोमीटर न थांबता आम्ही गेलो आणि मग तिथे गुरुदत्त हॉटेल मध्ये सगळ्यांनी चहा व वडापाव वर ताव मारला आणि पुढे प्रवास सुरु केला.

आम्हाला कुठेही थकवा जाणवत नव्हता कारण विठ्ठलाची ओढ होती. पुणे पाटस ला थोडी विश्रांती घेलती म्हंजे तोडे पाय मोकळे केले आणि सरळ भिगवणला थांबायचे ठरले कारण मधात कुठे थांबलो तर उशीर होईल असं वाटत होत आणि सूर्यराजा आपली ऊर्जा पसरवून आम्हाला सारखं सारखं पाणी पिण्यास भाग पडत होता खरंतर आम्ही भिगवणला थांबलोच नाही कारण संपूर्ण रोड हा चढ आणि उतारांनी भरल्या असल्या मुळे थांबायला नको असं वाटत होत आणि थोडं समोर भाला मोठा चढ चढवून खूप दमलो व एक कडुलिंबाचे झाड बघून थांबलो आणि सांगायला थोडं खाऊन एक एक लिंबू शरबतवर ताव मारला. लिंबाची सावली थंडगार हवा असं वाटत होत कि इथेच झोपून जावं पुणे पुढे जायचं होत ५ ते १० मिनिट तिथे विश्रंती घेऊन इंदापूर चा दिशेने वाटचाल सुरु केली. सायंकालीन प्रवास करताना जे जग दिसत ते खूपच वेगळं असत ज्या गावातून आपण जातो तिथले लोक एका एका उत्सुकतेचा भावनेने बघत असतात आणि अडवून प्रश्न विचारतात कुठून आलाय कुढे जाणार काही लोक पाणी देतात एक वेगळाच अनुभव तुमच्या आठवणींच्या शिदोरीत अधिक होत जातो मधात काही पत्रकार पण भेटले त्यांनी पण प्रवास वर्णन जाणून घेतला आणि फोटो घेतले. नंतर आम्ही इंदापूर ला हॉटेल माउली मध्ये मस्त भाकर, खिचडी, आणि साधी भाजी वर ताव मारून तिथे ३.३० परियंत आराम केला. १५० किमी आंतर पार केला होता.

पुढे  अकलूज च्या दिशेने पायडल मारली रोड तास जरा खराबच होता पण थांबून उपयोग नव्हता सगळा नुसता चढ म्हणजे सतत पायडल मारणे हाच एक पर्याय. अकलूज सोडून पुढे गेलो आणि वेळापूरला आणि बाकी मेंबरची वाट बघत बसलो पण मग आभाळ बघून पुठे जाण्याचा निर्णय घेलता थोडाच पुढे गेलो आणि रिमझिम पाऊस सुरु झाला एका गोठ्यात आम्ही तिघेही थांबलो आणि मग सगळी गॅंग मागून अली आणि रिमझिम पावसात प्रवास सुरु केला पण लगेच २ मिनिटात पावसाचा जोर खूप वाढला व आम्हाला एका तयार होत असेलेल्या हॉटेलात आसरा मिळाला तिचे पण काही गावकरी भेटले खूप चांगले होते ते सलग २ तास मुसळधार पाऊस आणि वारा पण सगळी टीम सोबत असल्यामुळे आनंद होता. जसा पाऊस कमी झाला आम्ही पुढे निघाले तिथे वाटीच एक सकाळ सोलापूर चे पत्रकार भेटले आणि त्यांनी गरम गरम वडापाव ची मेजवानी दिली एक तर खूप भूक लागली होती आणि पावसात गरम गरम वडापाव म्हणजे शब्दच नाही.

पुढे पंढरपूर फक्त ३० किलोमोटर होते पण रस्ता संपत नव्हता रात्र झाली होती सगळ्यांनी सायकलींचे लाईट सुरु केले होते आणि पायडल मारत होते. शेवटी पायडल मारता मारता रात्री ९.३० ला शनिवार १७ जून ला आम्ही सगळे पंढरपूरला पोहोचलो आणि पुणे ते पंढरपूर एक प्रवास पूर्ण झाला. काही जण खूप खुश होते कारण एक स्वप्न पूर्ण झाले होते तर काही जण उद्या रिटर्न सायकल वर जायचं म्हणून नॉर्मल होते. कारण त्यांचा टार्गेट ४७० किलोमीटर होते. काही जणांना भारत पाकिस्तान अंतिम सामन्याचे वेध लागले होते. वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे विषय शेवटी २३५ किलोमीटर पूर्ण झाले. अमित लोंढे , स्वामिनाथन , हरी राम , राजेश , विवेक यांनी आधी येऊन एक घरामध्ये  जेवण व राहण्याची सोय केली होती.

 ट्रेकर असलेले सचिन वाळके यांनी २० किलोमीटर राईड ते डायरेक्ट २३० किलोमीटर राईड असा टप्पा पार केला होता . स्वामिनाथन श्रीनिवासन , राजेश राणा , हरी राम यांनी प्रथमच इतकी दूर ची सायकल राईड केली होती. अजित पाटील , कपिल लोखंडे व सौरभ कान्हेदे यांनी संपूर्ण राईड चे मस्त नियोजन केले होते. गिरीराज उमरीकर व दीपक नाईक यांनी सर्व शूटिंग व फोटोग्राफी ची जबाबदारी घेतली होती. टेनिस वर्मा याचा उत्साह व सायकल राईड चा अनुभव आतिशय कौतुकास्पद होता. आकाश कुर्हाडे आणि विकास शेळके यांनी उशीर झाला तरी राईड पूर्ण केली. आय सी सी कोअर कंमीटी मेंबर गणेश भुजबळ यांनी सर्वाना हडपसर पर्यंत बॅग कार मध्ये सोडण्याची मदत केली त्याच प्रमाणे पाण्याची पण सोय केली. आकुर्डी पासून निघालेल्या सायकल रायडर्स ला त्यामुळे सायकल हडपसर पर्यंत खूप मदत झाली. आय सी सी कोअर कंमीटी मेंबर विश्वकान्त उपाध्यय , अमित खरोटे , अभिजीत लोंढे व यतिश भट्ट यांनी शुभेच्छा दिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी ४ ला गजू,अजित,अविनाश,टेनिस मंदिर मध्ये दर्शन घेऊन ५ ला परती चा प्रवासाला निघाले बाकी सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या कारण परत २३० किलोमीटर अंतर पार करायचे होते. टेम्भूर्णी मार्गे मार्गक्रमण सुरु झाले रोड मध्ये काही मित्र भेटले एकमेकांना शुभेच्छा देत हायवे आला. आता माइलस्टोन सुरु झाले पुणे १८० किलोमीटर , विरुद्ध दिशेने येणार खूपच वारा होता त्यामुळे अंतर कापणे खूपच अवघड जात होते पण जबरदस्त ईच्छा शक्ती मुळे मजल दर मजल चालू होते. परंतु चा प्रवासात प्रथम टेम्भूर्णी ला नास्ता केला मस्त पोहे, शिरा , भजी खाल्ली. पुढे सूर्य डोक्यावर आला पण ढग असल्या मुळे थोडी ऊन सावली चा खेळात इंदापूर – पळसदेव – उजनी डॅम – भिगवण असा प्रवास केला. वाटेत आय सी सी चे हडपसर येथील सहकारी डॉ. चंद्रकांत हरपळे , डॉ.  रवी झाँझुर्णे यांची भेट झाली त्यांनी आमचा एक सदस्य टेनिस वर्मा चा सायकल ची पंचर काढून दिली व पुढील प्रवासाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.  भिगवण येथे जेवण करून पुढे कुरकुंभ – रावण गाव – यवत – उरुळी कांचन – हडपसर असा प्रवास केला व सर्व जणांनी ४००० मीटर पेक्षा जास्त उंची पार करत ४७० किलोमीटर चा प्रवास २ दिवसात एकमेकांना शुभेच्छा देऊन पूर्ण केला.

आय सी सी डिव्होशनल सायकल राईड मध्ये  गजानन खैरे , अजित पाटील, अविनाश अनुशे, कपिल लोखंडे, सौरभ कान्हेडे , गिरीराज उमरीकर, दीपक नाईक,  स्वामिनाथन श्रीनिवासन , राजेश राणा , हरी राम, टेनिस वर्मा , आकाश कुर्हाडे , विकास शेळके,  सचिन वाळके , अमित लोंढे , विवेक खेडकर , ज्ञानेश्वर काशीद , नरेशकुमार लांबा , श्रीवत्सा के आर , प्रियदर्शन हटकर यांनी सहभाग घेतला होता.

"bycical"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.