उत्तुंग असा तुंग! कठिणगड…(फोटोफिचर)

(किरण शिंदे)
एमपीसी न्यूज – पावसाळ्यात मावळातील अनेक ठिकाणी स्वर्ग अवतरत असतो..त्यातीलच एक ठिकाण म्हणजे किल्ले तुंग (कठिणगड) पुण्यापासून केवळ 75 किमी अंतरावर. वर्षाविहारासाठी, ताम्हिणी घाट, लोणावळा, सिंहगड या नेहमीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी भेट देणा-या पर्यटकांनी या परिसरात धाव घेतली तर, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे नक्कीच पाहायला मिळेल.

भात पिकासाठी ओळखल्या जाणा-या मुळशी -मावळ परिसरातील पौड-कोळवण-जवण-शिळीम-तुंग या रस्त्याच्या प्रवासातच रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली आणि तुडूंब भरलेली भातखचरे, त्यामध्ये सुरू असलेली भात लावणीची लगबग, ओसंडून वाहणारे नदी-नाले तर मध्येच कोसळणा-या आणि मध्येच थांबणा-या पावसाच्या सरी, डोंगररांगावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे असे नयनरम्य दृष्य पाहता-पाहता तुंग किल्याच्या पायथ्याशी कधी पोहचाल हे कळणारही नाही.

पवन मावळातील घाट रक्षक किल्ला अशी तुंग किल्ल्याची ओळख होती. पूर्वीच्या काळी बोरघाटमार्गे चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्याचा वापर होत असे. पायथ्यापासून एक तासाच्या चढाईनंतर तुंग किल्यावर पोहोचता येते. चढणीची वाट जरा बिकटच, त्यात कोसळणा-या पावसामुळे काही ठिकाणी या वाटेलाच छोट्या धबधब्याचे स्वरुप आलेले. या वाटेने जातानाच पावसाचा आणि धुक्याचा लपंडावही अनुभवता येईल.

गडावर जाणारी ही वाट छोटीशीच पण दमछाक करणारी. तासाभराच्या चढाईनंतर बालेकिल्यावर पोहोचता येतं..दरवाजातून आत प्रवेश करताच छोट्याशा दगडी मंदिरात गणपती बाप्पा विराजमान आहेत..त्याला लागूनच पाण्याचे टाके आहे..तुंग किल्ला तसा फारसा मोठा नाही. दिड-दोन तासात पालथा घालता येतो. गणपती मंदिराला लागूनच बालेकिल्यावर जाण्यासाठी वाट आहे. बालेकिल्यावर जाण्यासाठी जोरात सुटलेल्या वा-याचा सामना करावा लागेल, पण तो काही वेळापुरताच..काही मिनिटांच्या चढाईनंतर बालेकिल्यावरील तुंगाई मातेचे दगडी मंदिर नजरेस पडेल. मोकळ्या आकाशात पसरलेली धुक्याची चादर बाजुला होताच दूरवर पसरलेला पवना धरणाचा जलाशय पाहता येईल. शिवाय दुस-या बाजूला डोंगराच्या कुशीत वसलेल्या लहानश्या वाड्या वस्त्याही नजरेस पडतील..

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

"kathingad

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.