लोहगड – अविस्मरणीय अनुभव…..


(गणेश सोनवणे)

एमपीसी न्यूज – लोहगड ट्रेक हि माझी पहिलीच वेळ….अन् विशेष म्हणजे सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारे आनंद बनसोडे यांच्या सोबत ट्रेकींग करणे हि माझ्या साठी अन् आमच्या मित्र परिवारासाठी खुप अभिमानास्पद बाब होती..मी या ट्रेकींग ला खुपच उत्सुक होतो.

पुण्याहुन पहाटे ५:४५ च्या लोकलने आम्ही मळवली ला गेलो व तेथून आम्ही ६ किमी दूर असलेल्या त्या रिमझीम पावसाचा आनंद घेत पायी निघालो.मला तर वाटलं होत की,ट्रेकींगला फक्त तरूणायीच येईल पण या लोहगड सफरी ला काही ज्येष्ठ मंडळी, व्रध्द हि सामील झाले होते अन् आमच्या पेक्षा तेच उत्साही होते…

सकाळ तो रम्य निसर्ग,हिरवळ, अडवळणी रोड,मुसळधार पाऊस अन् त्या हिरवी गोधडी परिधान केलेल्या गडावरून पळणारे धुके मी पहिल्यांदाच अनुभवत होतो, यामध्ये चार चांद म्हणजे आनंदजी बनसोडे,करण पंजाबी, प्रवीण डोके, निहाल बागवान यांच्या सोबत सफर करताना खुपच भारी टायपच फिलींग येत होत जस काय की,आम्हीच Everest वीर आहोत…

असच पुढे आमच्या मित्र परिवारा सोबत निसर्गाचा आनंद घेत मजा, मस्ती, धम्माल करत चालतच राहिलो प्रत्येक जण आपापल्या परीने Enjoy करत होता.ज्येष्ठ मंडळी तर खुपच उत्सूकतेने सर्व काही Enjoy करत होते, त्या मुसळधार पावसात चहा पिण्याची ओढ,गरम भाजलेल्या मक्याचा अस्वाद तर रम्य वातावरणात एक प्रकारे थ्रिल च आनत होतं…

जस जसं आम्ही तो चढ चढत होतो तसं तस मला पाठी वरील बॅगमुळे थोडावेळ थकवा ,अवघडल्या सारखं झालं पण मित्रांच्या धम्मालबाजी मुळे तो थकवा लगेच दूर पळाला…

प्रत्येक क्षण ना क्षण आम्ही मोबाईल कैमरात कैद करत होतो.थोडक्यात सांगायचं झालं तर मी फोटो काढून घेण्याच्या (स्वताचे) बाबतीत तसा मी खुपच शौकीण (व्यसनी)आहे. एकही क्षण मी सोडला नाही प्रत्येक क्षण मी कैद केलेत(#Selfie विषयी तर बोलायलाच नको) आनंद दादा सोबत तर खुपच काढलेत. विशेष म्हणजे आनंद दादा सोबत सेल्फि काढताना अपसुक येणारी त्यांची ती ☺? स्माईल एका शांत पाण्यात एक छोटासा खडा मारावा अन् त्यातून तो तरंग निर्माण ह्वावा त्याचीच आठवन करून देते…

तेथील धबधबा तर फारच भारी होता आता पर्यंत मी धबधबा टि.व्ही वर च पाहत होतो पण प्रत्यक्षात पाहताना ते रोमांचक वाटत होत डोंगरावरून वेगाने येणारं ते शुभ्र पाणी,पडताना त्याचा तो मोठासा आवाज वेगळाच अनुभव देऊन जात होतं. ते निसर्ग सौंदर्य, गारव्याची झुळूक,तो मुसळधार पाऊस अनुभवताना ‘गारवा’ अल्बमचा कवी.सौमीत्र च्या दोन ओळी आठवल्या

"पाणी झरत चालले
वर आभाळ फाटले,
पावसाने पावसाला
वर ढगात गाठले…"

मला शक्यतो पावसात भिजायला आवडत नाही पण या लोहगड ट्रेकींगला मित्रांसोबत मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला एक प्रकारे मन चिंब ‘पावसाळी,झाडात रंग ओले’ असच वाटू लागू लागलं…

हे सर्व करता करता आम्ही एकदाचे त्या मुसळधार पावसात लोहगडावर पोहचलो हे मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होतो उंचीवरून दिसनारा तो निसर्ग सौंदर्य नैत्रदिपक होता नैत्रसुख म्हणजे काय असत ?हे मला कळून आलं. लोहगडावरील उंचीवरून पाहत असताना मला आनंद दादाच एक वाक्य आठवलं,

‘आपण इतके उंच जावे की,
आपला अपमान करायला तिथे कोणीच नसेन’

लोहगडावरील विंचू कडाही पाहिला. धुक्यात हरवलेले आमची मित्र मंडळी ही पाहीले, तो रिटर्न येणारा पाण्याचा धबधबा हि अनुभवला तेथील प्रत्येक क्षण ना क्षण मी मोबाईल मध्ये कैद केले..सर्वांसोबत सेल्फी तर खुपच झाली अन् खरं सांगायच तर पहिल्यांदाच पावसात मनसोक्त भिजलो…

हि सफर पुर्ण झाल्या नंतर मस्त पैकी जेवणाचा आस्वाद घेतला नंतर आम्ही परतीच्या वाटे ला निघालो. मळवली स्टेशन वर आम्ही लोकलची वाट पाहत असताना च सर्वांना चेष्टा करण्याचा मुड आला अन् चेष्ट्याच्या चक्रा मध्ये त्यांना मीच घावलो लोकल मध्ये तर आनंद दादांनी तर चांगलच मला फिरवलं,इतकच नाही आनंद दादा नी फेसबुकवर ऐक पोस्ट केली लोहगड ट्रेक गणेश सोनवणे यांच्या नेतृत्व खाली यशस्वी….माझी अवस्था तर वेगळी च झाली होती…दादानी नंतर समजाऊन सांगितलच चेष्टेच काही वाईट वाटून घ्यायच नसतं…

मला या गोष्टी चा आप्रुप खुप वाटतं ट्रेकींगला आलेले सर्वजणांशी आमची मैत्री इतक्या कमी वेळात घनिष्ठ झाली कि,जसे की आम्ही फार पुर्वी पासूनचे मित्र आहोत पण खरं सागायच झालं तर हि आमची पहिच भेट होती या एका दिवसात खुप मित्र मला लाभले.

आनंद दादाच्या सहवासात मला……

"आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहिकडे”

या काव्य ओळीचा प्रत्यय आला त्यांच्या सोबत सफर करताना खुपच #आनंदीमय वाटत होतं.एकूणच 360 Explorer टिम सोबत लोहगड ट्रेक चा अनुभव हा चिरकाल टिकनारा होता. अविस्मरणीय क्षण आम्ही जगलो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.