आभूषणांनी सजविलेल्या गणेश मूर्तींना यंदा मोठी मागणी

एमपीसी न्यूज – यंदा गणपतीचे आगमन लवकर होत आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 25 ऑगस्टला आहे. त्यामुळे सध्या गणेश  मूर्ती बनविणयाच्या कारखान्यात जोरदार लगबग सुरू झालीय. आभूषणांनी सजलेल्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात  मागणी असल्याचे पिंपळे गुरव येथील प्रज्यो सिद्धी आर्टचे प्रमोद दरेकर यांनी सांगितले.

दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर महिन्यात मुक्कामाला येणारे गणपती यंदा ऑगस्टलाच येत आहेत. तुळशीबाग गणपती, मंडईचा गणपती या मूर्त्यांना जास्त मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तीच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

छोटे गणपती साडेपाचशे ते साडेआठशेपर्यंत तर  मध्यम आकाराचे गणपती एक हजार ते साडेतीन हजार व मोठे गणपती चार हजार ते दहा हजारांवर किंमती आहे. यात विविध आभूषणांनी सजविलेल्या गणपतीच्या मूर्तीला भक्तांची जास्त मागणी आहे. त्याच्या किंमती अडीच हजार ते बारा हजारांपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.