खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी १० महिन्यानंतर जेरबंद


एमपीसी न्यूज- एका खून प्रकरणात 10 महिन्यापासून फरार झालेल्या दोन आरोपीना खडक पोलिसांनी अखेर सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात एका इसमावर प्राणघातक हल्ला केल्याचा तसेच विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

दिनेश मारुती धावडे वय २७ रा. आणि मनोज  उर्फ पप्या चंद्रकांत शिर्के वय २७ दोघेही राहणार बोपखेल. अशी या आरोपींची नावे आहेत.

 
याबाबतची माहिती अशी की, खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गजानन सोनुने आणि उमेश काटे याना अलिबाग येथे दोन्ही आरोपी आले असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्या माहितीनुसार खडक पोलिसांच्या एका पथकाने अलिबाग येथे जाऊन सापाला रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघेही आरोपी मागील १० महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते.

त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात संतोष कुरावत  या इसमावर प्राणघातक हल्ला केल्याचा तसेच विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. खडक पोलीस पुढील तपस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.