पु.लं.च्या जीवनावर आधारीत सांगितिक कार्यक्रम


फर्माइशे निर्मित एका खेळीयाने – श्रावणबाळ फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम 

एमपीसी न्यूज – श्रावणबाळ फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित सांगितिक दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फर्माइशे निर्मित एका खेळीयाने हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 1.00 ऑगस्ट रोजी, सायंकाळी 5.00 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती  श्रावणबाळ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बिडलान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रवीण गोखले उपस्थित होते. पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत हे सांगितिक चित्रचरित्र आहे. कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना प्रवीण गोखले यांची आहे. तर संगीत संयोजन केदार परांजपे यांचे आहे. कार्यक्रमात गायिका संपदा जोशी, चैतन्य कुलकर्णी यांचे गायन तर, रमाकांत परांजपे, दर्शना जोग, विक्रम भट, अभय इंगळे वादन करणार आहेत.

प्रवीण गोखले म्हणाले की, पु.ल. देशपांडे हे संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते लेखक आहेत. त्यांचे लेखन अतिशय वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेली गाणी, त्यांचे लेख हे नव्याने प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी एका खेळीयाने हा कार्यक्रम केला जाणार आहे.  पु.लं. नी केलेले बा.भ. बोरकर, बाबासाहेब पुरंदरे, कुसुमाग्रज यांचे व्यक्तीचित्रण कार्यक्रमात सादर केले जाणार आहे. यासोबतच पु.लं. ची दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यावर त्यांनीच लिहिलेले स्वगत दाखविले जाणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.