एचआर कनेक्ट असोसिएशनतर्फे महाळुंगे येथे वृक्षारोपण



एमपीसी न्यूज – एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वनविभागाच्या क्षेत्रात दीडशे पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. 68 कंपन्यांमधील एचआर अधिका-यांनी मिळून हा उपक्रम राबविला.

शहराचे संतुलन राखायचे असेल तर निसर्ग टिकला पाहिजे. समृद्ध वनराईतून रिसर्ग समृद्ध होणार आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी किमान 100 झाडे जोपासण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ज्या सदस्यांचा वाढदिवस जुलै महिन्यात आहे, अशा सदस्यांचा वाढदिवस कार्यक्रमावेळी करण्यात आला. उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.

सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत असोसिएशनच्या सदस्यांनी कुटुंबीयांसमवेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. उपक्रमाच्या आयोजनासाठी एचआर कनेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी संतोष चव्हाण, अनिल भोईटे, वनराज भोसले, चेतन मुसळे, अक्षय दिघे, सतिश पवार, धीरज अधिकारी , शिवाजी चौंडकर, मधुकर सूर्यवंशी, संजय वाघमारे, अर्जुन माने, विजय पाटील, सोपान फरांदे, आत्माराम बोचरे, सागर कडू, सोनाली देसाई, स्वप्नील कांगणे, आनंद जोशी, साई पांचगे यांनी विशेष परिश्रम घेतले. असोसिएशनच्या वतीने यापुढे वेळोवेळी पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.