जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती व स्तनपान शिबिर


रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील दवाखाने व मातांना भेट देत रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या वतीने मातांमध्ये जनजागृती व स्तनपान शिबिर आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तनपान दिनानिमीत्त 1 ते 7 ऑगस्ट या सप्ताह जागतीक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदींनी सहभाग घेतला व शहरातील दवाखान्यांना भेटी दिल्या जाणार आहेत. या शिबिराची सप्ताहाची सुरुवात आज पिंपरीच्या डॉ. डि. वाय. पाटील रुग्णालयातून करण्यात आली. यावेळी मातांना डिंकांच्या लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, फर्स्ट लेडी मुग्धा कुलकर्णी, सर्व्हिस डायरेक्टर सुहास ढमाले,  आयपीपी डॉ. शुंभागी कोठारी, रोटेरियन रवी राजापुरकर, इनरव्हिल क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापुरकर, तसेच सदस्य स्मिता इवळे, डॉ. रंजना कदम, प्रणिता आलुरकर, नेहा देशमुख तसेच डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या डॉ, शैलजा माने, डॉ. विनीता पांडे, डॉ. अगरखेडकर, डॉ. करंबेलकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हेमंत कुलकर्णी म्हणाले की, आम्ही दरवर्षी हे शिबिर घेतो. यामध्ये वंचित बालकांना मातांचे दूध मिळावे ही अपेक्षा असते. त्यासाठी पुढे जाऊन रक्तपेढी असतात तशाच पिंपरी-चिंचवड परिसरात माता दुग्ध पेढी तयार करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी येत्या तीन महिन्यात कामाला सुरुवातही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तर सविता राजापुरकर म्हणाल्या की, स्तनपान केवळ बाळाला उपयुक्त नसते तर ते मातांनाही उपयुक्त ठरते. त्यामुळे मातांनाही स्तनांच्या ब-याच आजारापासून मुक्ती मिळते. यासाठी महिलंनी पुढाकार घ्यावा, त्यांचे दूध दान करावे यासाठी आमचा क्लब प्रयत्न करत आहे. त्यासाठीच हा जनजागृती सप्ताहही राबवला जात आहे.

तर मिल्क बँकविषयी माहिती देताना डॉ. माने म्हणाल्या की, डी. वाय. पाटील रुग्णालयात दिवसागणिक 12 ते 15 महिला द मिल्क बँकमध्ये त्यांचे दूध दान करतात. त्यातून पेढीमध्ये दीड ते दोन लीटर दूध संकलित होत. हे दूध शितगृहात पुढे सहा महिने राहू शकते. मात्र, दुधाची वाढती मागणी पाहता स्त्रियांनी स्तनपानासाठी पुढे यावे अशी आमची अपेक्षा आहे.

तर रवी राजापुरकर म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ निगडी व डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय यांच्या वतीने येत्या काही महिन्यात डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात एक अद्यावत ह्युमन मिल्क बँक तयार करण्यात येणार आहे. ज्याचा लाभ शहर व शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील महिलांना लाभ होणार आहे.

यावेळी तज्ज्ञांनी समुपदेशन करताना बाळांना दूध किती गरजेचे असते, मातांनाही स्तनपानाची का गरज असते. यासाठी पोषक आहार कसा असावा, मातांनी स्तनपान घेताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली व स्तनपानाचे महत्व त्यांनी यशोदेचा पान्हा, वाचवी देवकिचा कान्हा या एका वाक्यात पटवून दिले.

यावेळी 50 मातांना डिंकाचे लाडू व स्तनपानाबद्दल जनजागृती करणारे पत्रकही देण्यात आले. तसेच दूध दान करणा-या मातांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. असा अनोखा उपक्रम राबविणारा जिल्ह्यातील रोटरी हा एकमेव क्लब आहे. ज्याद्वारे मातांना व बालकांना त्यांच्या आहार, स्तनपान यांचे महत्व पटवून देण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या वतीने  दरवर्षी राबवला जातो. 
"IMG

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.