थेरगावातील बॅडमिंटन हॉल मानांकनानुसार बांधण्याची मागणी


एमपीसी न्यूज – थेरगाव, डांगे चौक येथील सभागृहाचे रुपांतर करुन बॅडमिंटन हॉल केल्यामुळे खेळाडूंना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे बॅडमिंटन हॉल मानांकनानुसार बांधण्याची मागणी, नगरसेविका माया बारणे यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, थेरगावातील, डांगे चौकात एकमेव बॅडमिंटन हॉल आहे. थेरगावमधील खेळाडूंना खेळण्यासाठी हॉल उपलब्ध होत नाही. येथे 1989 येथे बहुउद्देशीय इमारत बांधली होती. त्या इमारतीमधील सभागृहाचे रुपांतर बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले.

हा हॉल मानांकनानुसार बांधण्यात आला नाही. त्यामुळे खेळाडूंना विविध सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे ही इमारत पाडून या ठिकाणी दोन नवीन बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात यावेत, अशी  मागणी नगरसेविका बारणे यांनी निवेदनातून केली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.