Pune : हडपसर कचरा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र

कचऱ्याच्या गाड्या अडवून पाठ्वल्या परत

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथील रॉकेम प्रकल्पात पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठून स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे आणि नागरिकांनी आज हडपसर येथे आंदोलन केले.

हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. त्यामुळे अशा प्रकारे कचऱ्याच्या गाड्या अडून विरोध नोंदवण्यात आला.नगरसेवक योगेश ससाणे विरोधी पक्ष नेते चेतन तुपे व स्थानिक नागरिक उत्तम आढाव, मामा आल्हाट, जॅकी कल्याणी, नागेश काळुंखे, आप्पा गरड, आप्पा शिंदे, तुषार जाधव, युसुफ पठाण, इरफान तांबोळी, तोफिक सैय्यद, चिंतामण लाकडे, नदीम पटेल, शरीफ पठान आदी उपस्थित होते.

यावेळी योगेश ससाणे म्हणाले," यावेळी कचऱ्याच्या गाड्या सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठवल्या आहेत. मात्र नवीन प्रकल्पाचे बांधकाम सत्ताधा-यांनी थांबवले नाही तर रॉकेमसुध्दा बंद पाडला जाईल. रामटेकडी येथे सध्या. 300 टन प्रतिदिन कचरा येत आहे. जर 1250 टनांचे नवीन प्रकल्प चालू झाले तर रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना रस्त्यावर चालणे अवघड होणार आहे " कचरा डेपोला विरोध असून आज गाड्या परत पाठवल्या. मात्र प्रकल्पाचे काम न थांबल्यास उद्या गाड्या फोडू असा इशारा ससाणे यांनी दिला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.