शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

देहूरोड-आकुर्डी व आकुर्डी-चिंचवड दरम्यान 21 ते 29 मार्चपर्यंत ब्लॉक

एमपीसी न्यूज – येत्या 21 ते 29 मार्च या कालावधीत देहूरोड ते आकुर्डी व आकुर्डी ते चिंचवड या रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकच्या दुरुस्तीनिमित्त (डीप स्क्रिनिंग) ब्लॉक ठेवण्यात आला आहे. आजपासून ते बुधवारपर्यंत (दि. 29) रोज दुपारी तीन तास हा ब्लॉक ठेवण्यात येणार आहे.

या ब्लॉकमुळे 11075 एलटीटी-बिदर एक्स्प्रेस मंगळवारी, 11011 एलटीटी-नांदेड एक्स्प्रेस बुधवारी, 17222 एलटीटी-काकिनाडा एक्स्प्रेस गुरुवारी व 11017 एलटीटी-कराईकल एक्स्प्रेस शनिवार या रेल्वे देहूरोड स्थानकावर 22 मिनिटे थांबविण्यात येणार आहेत.

तर रोज दुपारी 1 वाजता पुणे ते लोणावळा धावणारी लोकल लोणावळा ऐवजी चिंचवड स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर दुपारी 2 वाजता लोणावळ्याहून सुटणारी लोणावळा-पुणे लोकल चिंचवड येथून पुण्यासाठी सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news