उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पवना धरण 56 टक्क्यांवर

पिंपरी-चिंचवडकरांना यंदाही करावी लागणार पाणी बचतीची कसरत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण मार्चमध्येच 56.19 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे यावेळीही पिंपरी-चिंचवडकरांना पाणी बचतीची कसरत करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

शहराला पाणी पुरवठ्यासाठी दररोज सरासरी 450 एमएलडी पाणी उचलले जाते. त्यानुसार या धरणातील पाणी शहरवासीयांना येत्या जुलै महिन्यापर्यंत पुरवून वापरावे लागणार आहे. एकीकडे पुण्याने दररोज दोनवेळा पाणी पुरवठा सुरु केला असला तरी पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापही एकवेळच पाणी पुरवाठा केला जात आहे. याविषयी पिंपरी-चिंचवडचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र दुधेकर यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, अद्याप तरी जलसिंचन विभागातर्फे आम्हाला बैठकीसंदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे तुर्तास तरी एकवेळ पाणीपुरवठा हेच धोरण कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्यावर्षी धरण परिसरात सुमारे 1 हजार 800 मिली पाऊस झाला. त्यामुळे पावासाळा चांगला गेला, असे म्हटले जात असले तरी सत्य परिस्थितीत एकवेळ पाणीपुरवठा असूनही आज अखेर धरण 56.19 टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे. तसेच वेध शाळेने यावेळी पावसावर अलनिनोचे सावट असल्याची चिन्हे वर्तविली आहेत. अपवाद वगळता भारतासाठी तरी अल निनो म्हणजे दुष्काळ हे समीकरण मानले जाते. त्यामुळे यावर्षी सरासरी एवढा पाऊस पडेल की नाही, अशी भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याप्रमाणे  यावर्षीही पाणी बचतीची कसरत शहरवासीयांना करावी लागणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.