दहावीच्या परिक्षांना 7 मार्चपासून सुरुवात

पिंपरी-चिंचवडमध्ये 22099 विद्यार्थी परीक्षा देणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षा 7 मार्चपासून सुरू होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 30 परीक्षा केंद्रांवर 22099 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. 

दहावीची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च या कालावधीमध्ये होणार असून या परिक्षांचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या परिक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरीतील हिंदूस्थान अँन्टिबोयटिक स्कूलमधून 845 विद्यार्थी, जयहिंद हायस्कूलमधून 850 विद्यार्थी, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्यु कॉलेजमधून 1174 विद्यार्थी, पिंपळे सौदागर येथून आण्णासाहेब मगर माध्य. विद्यालयातून 621 विद्यार्थी, चिंचवडमधील सौ. टी. एस. मुथ्थ कन्या प्रशालेतून 700 विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूलमधून 1306 विद्यार्थी, पीसीएमसीचे माध्य. विद्यालयातून 603 विद्यार्थी, श्री छत्रपती शिवाजीराजे माध्य. विद्यालय 857 विद्यार्थी, कमलनयन बजाज स्कूलमधून 603 विद्यार्थी, आकुर्डीतील सेंट उर्सूला हायस्कूलमधून 573 विद्यार्थी, श्री म्हाळसाकांत विद्यालयातून 981 विद्यार्थी, श्री सरस्वती माध्य. व उच्च माध्य विद्यालयातून 707 विद्यार्थी, पीसीएमसा माध्य. विद्यालयातून 552 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

तर थेरगावातील प्रेरणा माध्य. विद्यालयातून 1186 विद्यार्थी, चिंचवडमधील गोदावरी हिंदी विद्यालयामध्ये 952 विद्यार्थी, सीएमएस इंग्लिश मीडियम स्कूलमधून 530 विद्यार्थी, पीसीएमसीचे माध्य. विद्यालयामध्ये 836 विद्यार्थी, ज्ञानदिप विद्यालय व सौ. अनुसया वाढोकर उच्च माध्य. विद्यालयातून 725 विद्यार्थी, मॉडर्न हायस्कूलमधून 427 विद्यार्थी, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथून 927 विद्यार्थी, पीसीएमसी कासारवाडी माध्य. विद्यालयातून 388 विद्यार्थी, भैरवनाथ माध्य. विद्यालयातून 830 विद्यार्थी, पीसीएमसी नेहरुनगर विद्यालयमधून 597 विद्यार्थी, श्री नागेश्वर विद्यालयमधून 631 विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज माध्य विद्यालयातून 762 विद्यार्थी, सयाजीनाथ महाराज माध्य. विद्यालयमधून 747 विद्यार्थी, श्री स्वामी समर्थ विद्यालयातून 735 विद्यार्थी, प्रियदर्शनी हायस्कूल 698 विद्यार्थी, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयमधून 308 विद्यार्थी, तळवडेतील राजा शिवछत्रपती विद्यालयातून 448, असे एकूण 22099 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.  

दहावी परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एमपीसी न्यूजकडून "बेस्ट ऑफ लक"….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.