Pune : राज ठाकरेंनी पुन्हा आवळला परप्रांतीय विरोधाचा राग 

एमपीसी न्यूज : मुंबई परप्रांतीयांना आंदण दिली का? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. एवढंच नाही तर फक्त गुजराती मारवाडींच्या संस्था का उभ्या राहतात? मराठी माणसांच्या संस्था का उभ्या राहात नाहीत असाही प्रश्न त्यांनी विचारला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांमधून दररोज 48 रेल्वे येतात.येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. त्यातून जे लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात ते कुठे गेले? यात गुन्हेगार कोण? पोटासाठी कोण आलंय? याचा शोध घेतला जातो का? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.