Pimpri : ‘एचए’ संघाच्या अध्यक्षपदी मुंबईचे खासदार मनोज कोटक
एमपीसी न्यूज – पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) संघाच्या अध्यक्षपदी मुंबईचे खासदार मनोज कोटक यांची, तर उपाध्यक्षपदी भारतीय मजदूर संघ प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ यांची निवड झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या जागी कोटक यांची निवड झाली आहे.
एचए कामगारांच्या आर्थिक अडचणी आणि अन्य प्रश्नांबाबत खासदार कोटक यांची मजदूर संघाच्या सदस्यांसोबत चर्चा झाली. कोटक यांनी कामगारांचे प्रश्न रसायन खात्याचे कॅबिनेट मंत्री सदानंद गौडा आणि राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा करुन लवकरच सोडविले जातील, असे सांगितले.
कामगारांच्या समस्या लवकरच दूर होतील, असा विश्वास मजदूर संघाचे सुनील पाटसकर, जनरल सेक्रेटरी कैलास नरुटे, विश्वनाथ अवघडे, विजय पाटील, आर. एल. जाधव, अबू बारणे यांनी व्यक्त केला.