Akurdi News : माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण
एमपीसी न्यूज – दिवंगत माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कृष्णानगर प्रभाग 11 येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या वेळी माजी महापौर व ज्येष्ठ नगरसदस्या मंगला कदम, कुशाग्र कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे योगेश गवळी, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस योगेश मोरे, ओबीसी सेल शहरअध्यश सारिका पवार, अक्षता थोरात व अजिंक्य थोरात उपस्थित होते.