Pimpri News: शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना रविवारी ‘कोविशिल्ड’ची लस ‘या’ केंद्रांवर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी) ‘कोविशिल्ड’,  ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने तर इतर ठिकाणी ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस

हेडगेवार जलतरण तलाव,  सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,  नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा खराळवाडी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा रहाटणी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, महापालिका शाळा वाकड, कन्या शाळा चिखली, घरकुल दवाखाना, तळवडे समाज मंदिर शाळा, प्रेमलोक पार्क दवाखाना,

कासारवाडी दवाखाना, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी आणि शितोळे शाळा जुनी सांगवी या 18 केंद्रांवर किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेले, कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.

या ‘आठ’ ठिकाणी ऑनदस्पॉट ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या आठ ठिकाणी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पध्दतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर लस मिळणार

संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, फकिरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवडस्टेशन, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना,  महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, सेक्टर 29 रावेत, नेहरुनगर उर्दू शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूल इंद्रायणीनगर, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी,  पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, महापालिका शाळा बोपखेल, गंगोत्री पार्क दिघी,

नूतन शाळा ताम्हाणे वस्ती, महापालिका शाळा जाधववाडी, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, भानसे स्कूल यमुनानगर,  प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती,  कांतिलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी,

गणेश इंग्लिश स्कूल दापोडी, दिनदयाल शाळा पवना बँकेमागे, संत तुकारामनगर, पिंपरी आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 31 केंद्रांवर कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

तर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर आणि आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथे 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 50 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,  अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.