Chinchwad Crime News : रिक्षाला झटू नको म्हटल्याने रिक्षाचालकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा  

एमपीसी न्यूज – रिक्षाचे आरसे खाली वर करणा-या व्यक्तीला रिक्षाला झटू नकोस, असे म्हटल्याने रिक्षाचालकास मारहाण केली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी मेडिकल, चिंचवड याठिकाणी शुक्रवारी (दि.13) हा प्रकार घडला. 

याप्रकरणी संजय नारायण जाधव (वय 43, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पप्पू, सिद्धू, प्रेम आणि एक महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जाधव हे आपल्या रिक्षात बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी पप्पू याने रिक्षाचे आरसे खाली-वर केले. फिर्यादी यांनी आरोपीला रिक्षाला झटू नकोस असे सांगितले. त्यावरुन फिर्यादी यांना आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.