Todays Horoscope 29 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 29.09.2021
- शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
- आज विशेष – अष्टमी श्राद्ध.
- राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
- दिशा शूल – उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – आद्रा 23.26 पर्यंत, नंतर पुनर्वसु.
- चंद्र राशी – मिथुन.
_______________________
आजचे राशीभविष्य-
मेष- (शुभ रंग- मोतिया)
आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदगच जास्त होईल. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील.
वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)
कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल अनपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे.
मिथुन – (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.
कर्क – (शुभ रंग- क्रीम)
हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.
सिंह- ( शुभ रंग- हिरवा)
काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. लॉक- डाऊन मुळे बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल.
कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.
तुळ – ( शुभ रंग -आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील.
वृश्चिक -( शुभ रंग – जांभळा)
काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.
धनु – ( शुभ रंग- निळा)
आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.
मकर – ( शुभ रंग – चंदेरी)
आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.
कुंभ -( शुभ रंग – गुलाबी)
आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.
मीन – ( शुभ रंग- भगवा)
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.