Vadgaon Maval : वडगाव मधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही फक्त दर्जेदार कामे करून घ्या – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे, त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर द्यावेत. वडगाव मधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे माझे काम आहे. पण नगरसेवकांनी देखील कामे दर्जेदार करून घ्यावीत आणि शहराच्या सौंदर्यात भर घालावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी सर्व नगरसेवकांना केले.

वडगाव मावळ येथील वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांची आमदार सुनील शेळके यांनी पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पूजा वहिले, मुख्याधिकारी जयश्री काटकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर,प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, अर्चना म्हाळसकर, सायली म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, उद्योजक राजेश बाफना, विशाल वहिले आदी उपस्थित होते.

वडगाव शहरातील नागरीकरण वाढत असल्याने येथील रस्ते प्रशस्त व मूलभूत सेवा-सुविधा सुसज्ज असाव्यात, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. प्रत्येक वार्डमध्ये सुरू असलेली विकासकामे व प्रलंबित विकासकामे याची पाहणी केली. त्यानंतर वडगाव नगरपंचायतमध्ये आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नगरसेवकांकडून वाॅर्डनिहाय कोणती विकासकामे सुरू आहेत. पुढील काळात प्राधान्याने कोणती कामे सुरू करावयाची आहेत, त्यासाठी किती निधीची आवश्यकता लागेल याची माहिती आमदारांनी जाणून घेतली. ज्या कामांसाठी निधी आवश्यक आहे. त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर द्यावेत. वडगाव मधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे माझे काम आहे. पण नगरसेवकांनी देखील कामे दर्जेदार करून घेऊन शहराच्या सौंदर्यात भर घाला, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी सर्व नगरसेवकांना केले.

तसेच नगरपंचायत इमारतीच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी, पाणी योजनेच्या कामांना गती द्यावी, त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटून नागरिकांना दिलासा मिळेल. कचऱ्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे इतर पर्यायांचा विचार करता येईल का, यावर चर्चा करण्यात आली. पंप हाऊसवरील विद्युत संबंधित खराब उपकरणे बदलावीत व एनर्जी ऑडिट करून घ्यावे. त्यामुळे वीजबिल कमी होण्यास मदत होईल. यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.