Todays Horoscope 21 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 21.05.2022
- शुभाशुभ विचार – 15.00 पर्यंत चांगला दिवस.
- आज विशेष – सामान्य दिवस.
- राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
- दिशा शूल – पूर्वेस असेल.
- आजचे नक्षत्र – श्रवण.
- चंद्र राशी – मकर.
—————————————-
आजचे राशीभविष्य –
मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांच्या मनावरील दडपण कमी होईल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व निर्माण कराल. नोकरदारांच्या बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा. आक्रमकता कामाची नाही.
मिथुन- ( शुभ रंग- डाळिंबी)
आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.
कर्क- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.
सिंह- ( शुभ रंग- गुलाबी )
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. आज ताकही फुंकून पिणे गरजेचे आहे.
कन्या-( शुभ रंग पांढरा )
तरुणांनी मौज मजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीर पणास लगाम गरजेचा आहे. व्यसने घात करतील. कला क्षेत्रातील मंडळी मिळालेल्या संधीचे सोने करतील.
तूळ-( शुभ रंग- पिस्ता)
आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा करावी लागेल. गृहिणी गप्पांमधून गैरसमज पसरवतील.
वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)
भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल.
धनु- ( शुभ रंग- जांभळा)
रिकामटेकड्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.
मकर-( शुभ रंग- नारिंगी)
आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.
कुंभ – (शुभ रंग- मरून)
अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांना घरापासून लांब रोजगार मिळेल. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल. घरातील मोठ्यांशी वाद होतील.
मीन – ( शुभ रंग- चंदेरी)
आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे.