Pune News : निगडे गावात पितापुत्रा सहित 4 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
एमपीसी न्यूज : भोर तालुक्यातील निगडे गावामध्ये (Pune News) एका पितापुत्रा सहित 4 जणांचा विजेच्या धक्कयाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.
पुणे- सातारा महामार्गावर हे गाव असून या गावा जवळून गुंजवणी नदी वाहते. विठ्ठल मालुसरे व सनी मालुसरे हे दोघे पिता पुत्र व त्यांच्या बरोबर असलेले अमोल मालुसरे आणि आनंदा जाधव या चार जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
Chinchwad News : चिंचवड येथून रिक्षा चोरीला
प्राथमिक माहितीनुसार निगडे गावाच्या हद्दीत गुंजवणी नदीच्या पाण्यात बंधऱ्याच्या बॅकवाटर मध्ये हे चार जण पाण्याची मोटर घेऊन ढकलत होते.(Pune News) त्यावेळेस अचानक पाण्यात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनास्थळी महावितरण, राजगड पोलीस अधिकारी पोहोचले आहेत.