Auto theft : चिंचवड व भोसरी येथून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज : चिंचवड व भोसरी परिसरात (Auto theft) रिक्षा चोरीची घटना घडली आहे. येथून रिक्षा चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुधीर दरेकर, वय 45 वर्षे, रा. साईबाबा नगर मारुती मंदिराच्या बाजूला,  चिंचवड यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा. द. वि कलम 379  अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा 13 डिसेंबर 2022 रोजी रात्री 9 वा ते 14 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5 वा च्या दरम्यान साईबाबा नगर मारुती मंदिराच्या बाजूला चिंचवड रेल्वे स्टेशन रोड, (Auto theft) चिंचवड या ठिकाणी घडला आहे. फिर्यादी यांची 80,000 रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची  रिक्षा ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेली आहे.

तर दुसर्या घटनेत सुधीर भोरे, वय 32 वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी, मूळ गाव – नागुलगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यांनी त्यांची रिक्षा चोरी गेल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेत अज्ञात इसमाच्या विरोधात भा.द.वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad fraud : टुरिस्ट पॅकेज देतो म्हणत केली 11 जणांची फसवणूक

9 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वा ते 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 वा चे सुमारास चक्रपाणी वसाहत भोसरी येथून सार्वजनिक तुमच्या कडेला पार्क केली असताना तीला (Auto theft) चोरून नेण्यात आले आहे. फिर्यादी यांनी त्यांची 1.5 लाख रुपये किंमतीची एक टीव्हीएस कंपनीची रिक्षा पार्क केलेली असताना ती अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमती शिवाय रिक्षाचे लॉक उघडून ती चोरी करून नेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.