Maval : उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमात फळे वाटप
एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या (Maval) वाढदिवसानिमित्त आंदर मावळातील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमात फळे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
येथील निराधार आजी आजोबांची शिवसेनेच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
Pune : पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय होण्याची आज शक्यता
शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथभाऊ कोंडे, कुसवली शाखाप्रमुख किरण शिंदे, वहाणगाव शाखाप्रमुख सोमनाथ कुडे यांच्या वतीने सहारा वृद्धाश्रम कुसवली येथे फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना संघटक मदन शेडगे, यशवंतराव तुर्डे, उमेश कुडे ,कुंडलिक खंडागळे, सोमनाथ शेलार, सुनील ठाकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने (Maval) उपस्थित होते.