Pavana Dam update : पाण्याची चिंता मिटली; पवना धरण 81 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची पाण्याची चिंता मिटली आहे कारण पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम ( Pavana Dam update) आहे.  गेल्या 24 तासात 49 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 81.47 टक्यांवर गेला आहे.

Pune : पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय होण्याची आज शक्‍यता

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला ( Pavana Dam update) जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 49 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  1723 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  1581 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 81.47 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 81.47 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 3.50 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 62.50 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.