Pune : पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय होण्याची आज शक्‍यता

एमपीसी न्यूज – 18  मे पासून पुण्यात  सुरू असलेली  पाणी कपात ( Pune ) रद्द करण्याचा निर्णय होण्याची आज शक्‍यता आहे.खडकवासला प्रकल्पामधील चारही धरणांतील पाणीसाठा 72.65 टक्के झाला आहे. खडकवासला धरणही भरले आहे. त्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे.

त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी (दि.29 ) आढावा बैठक घेणार असून त्यामध्ये पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. यंदा पाऊस उशिराने व सर्वसाधारण राहण्याचा ( Pune ) अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

Alandi : सलग सहाव्या दिवशीही डोळे लागण रुग्णसंख्येत घट

त्यामुळे पाणी साठ्याचे नियोजन 31ऑगस्टपर्यंत करण्याचा आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला दिला होता.त्यानुसार, 18 मे पासून दर गुरुवारी पाणी कपात सुरु केली होती.आता पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरण साखळीतील धरणांमधील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी कपात रद्द करण्याची मागणी होत ( Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.