Alandi : सलग सहाव्या दिवशीही डोळे लागण रुग्णसंख्येत घट

एमपीसी न्यूज – आळंदीमध्ये डोळे लागण  रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी (Alandi) घट झालेली दिसून येत आहे. आळंदी शहरातील शाळा व संस्थामध्ये मुलांची दुबार डोळे लागण तपासणी करण्यात येत आहे. तसेच शहरात वैद्यकीय आधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी सर्व्हे चालू आहे.

ग्रामीण रुग्णालयात तपासणी दरम्यान आढळणाऱ्या बाधित रुग्णांना व शाळा, संस्थामधील आढळणाऱ्या बाधित रुग्णांना औषधे दिली जात आहेत.

Today’s Horoscope 29 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

काल दि.28 जुलै रोजी  सर्व्हे झालेली संख्या 35120  इतकी होती. तर, बाधित नवीन रुग्ण 162 इतके होते. आत्तापर्यंत एकूण  डोळे आलेल्या रुग्णांची संख्या 8015 इतकी आहे.

तर आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 6502 इतकी आहे. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी (Alandi) माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.