Maval : कामशेत येथील व्यापारी कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील कामशेत येथील व्यापारी कुटुंब राजस्थान येथील मूळ गावी जात असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकासह कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 3) अबूरोड राजस्थान येथे झाला.
Kothrud : कोथरुड येथे महाविकास आघाडीतर्फे अंतरावली घटनेचा निषेध
लीलाबाई घेवरचंद रूपावत (वय 62), प्राची रूपावत (वय 14) व चालक हिरालाल प्रजापत अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. घेवरचंद रूपावत व त्यांची सून आशादेवी रूपावत हे दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत येथील व्यापारी घेवरचंद रूपावत हे कार मधून कुटूंबासह राजस्थान येथील गावी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 वर हनुमान टेकडीजवळ चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. त्यानंतर कार समोरून येणाऱ्या ट्रकच्या खाली घुसली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.