Chinchwad : बीआरटी मार्गातून वाहन नेल्यास होणार 1500 रुपये दंड

एमपीसी न्यूज – बीआरटी मार्गातून खासगी वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम पिंपरी-चिंचवड (Chinchwad) वाहतूक पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच खासगी वाहनांना बीआरटी मार्गातून प्रवेश बंद असल्याचा आदेश देखील काढण्यात आला आहे.

Maval : कामशेत येथील व्यापारी कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबत आदेश दिला आहे. बीआरटी मार्गिकेमध्ये अनेक प्रकारची हलकी व जड अवजड वाहने प्रवेश करत आहेत. त्यामुळे बीआरटी मधील स्टील रेलिंग, बस थांब्याचे वारंवार नुकसान होत आहे. तसेच रस्त्याचे विद्रुपीकरण होऊन वाहतुकीची शिस्त बिघडत आहे.

पीएमपीएमएलच्या बसेससाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत बीआरटी मार्ग बनविण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट व्हावी, प्रदूषण कमी व्हावे तसेच प्रवाशांना कमी वेळेत त्यांच्या निश्चित गंतव्य स्थळी पोहोचता यावे यासाठी प्रशासनाने बीआरटी सेवा सुरु केली आहे. मात्र बीआरटी मार्गातून वाहने चालविल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामध्ये जीवित आणि वित्त हानी देखील होत आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या बीआरटी मार्गातून बीआरटी बस खेरीज अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामध्ये केवळ अग्निशमन, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांना सवलत देण्यात आली आहे.

बीआरटी मार्गातून खासगी वाहने गेल्यास अशा वाहन चालकांकडून प्रथम 500 रुपये दंड घेतला जाईल. एकदा कारवाई केल्यानंतर देखील पुन्हा त्या वाहनाने बीआरटी मार्गातून प्रवास केला तर अशा वेळी 1500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे रिकाम्या रस्त्यावरून वाहने पळवणे काही वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.