Chikhali :दुकानात रहायचे नाही म्हणल्याच्या रागातून व्यावसायीकाला लोखंडी रॉडने मारहाण
एमपीसी न्यूज – दुकानात काम करत नाही तर दुकानात रहायचे (Chikhali)नाही असे म्हणलायाच राग आल्याने स्क्रॅप व्यावसायीकालाच लोखंडी रॉडने मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना कुदळवाडी, चिखली येथे शुक्रवारी (दि.6) घडली आहे.
याप्रकरणी राजू उर्फ प्रिन्स शंभुरानाथ तिवारी (वय 27 रा.कुदळवाडी) यांनी चिखली पोलीस (Chikhali)ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून रवी गौतम, सचिन गौतम, शिवचरण गौतम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Moshi : बस प्रवासात महिलेचे 1 लाख रुपयांचे दागिने चोरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे सचिन हा काम करत होता. त्याने काम सोडल्याने फिर्यादी यांनी सचिनला तु माझ्याकडे काम करत नाही, तु माझ्या दुकानात रहायचे नाही असे बजावले. याचा राग मनात धरून आरोपीने शुक्रवारी फिर्यादी यांच्या दुकानात जात शिवीगाळ केली, तुला बघतो म्हणत डोक्यात लोखंडी रॉड व दगड मारून गंभीर जखमी केले. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.