Moshi : बस प्रवासात महिलेचे 1 लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज –  मोशी चौक ते नाशिक या बसमधून प्रवास (Moshi) करत असताना एका महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने व काहीरोख रक्कम चोरीला गेली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.6) साडे दहा ते साडे अकरा या अवघ्या एक तासाच्या कालावधीत घडली आहे.

Thergaon : विद्यार्थ्यांनी स्वीकारले 100  देशी रोपांचे पालकत्व

याप्रकरणी संबंधीत महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पुणे-नाशिक महामार्गावर बसमधून प्रवास करत असताना मोशी चौकात असताना त्यांच्या पिशवीतील पाकिटातून 1 लाख रुपयांचे 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र व रोख 1 हजार 500 रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार 500 रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध (Moshi) घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.