Thergaon : विद्यार्थ्यांनी स्वीकारले 100  देशी रोपांचे पालकत्व

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील  खिंवसरा – पाटील विद्यामंदिर (Thergaon) शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.6) सुमारे 100 देशी वृक्षांचे पालकत्व स्वीकारले. लायन्स क्लब ऑफ पुणे व भोजापूर गोल्ड या सेवाभावी संस्थेच्या वतीने 2 ते 8 ऑक्टोबर हा सेवा सप्ताह म्हणून राबवला जात आहे.

 Pune : वसंत मोरे उतरणार खासदारकीच्या शर्यतीत ?

या सप्ताहाचा एक भाग म्हणून झाडांचे वृक्षालय (ग्रंथालय) हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत लायन्स क्लब इंटरनॅशनल 3234 डी-2 प्रांतपाल धनराज मंगनानी, विभागप्रमुख प्रीतम दोशी, भोजापूर गोल्ड चे अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड, नारायण हट इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मनीषा राक्षे यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडे रोपे सुपुर्द केली.

 यावेळी वीणा तांबे, स्मिता जोशी, कृतिका कोराम, गणेश शिंदे, संदीप बरकडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सीमा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. आसाराम कसबे यांनी आभार (Thergaon)  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.