Pune : वसंत मोरे उतरणार खासदारकीच्या शर्यतीत ?

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहराच्या खासदारकीच्या शर्यतीत प्रत्येक पक्षाचे (Pune) उमेदवार आहेत. असे असताना आता मनसेचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे हे सुद्धा या शर्यतीत उतरले आहेत. येत्या 10 ऑक्टोंबरला वसंत मोरे यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण पुणे शहरांमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत.

Maval : मावळातील विद्यार्थीनी घेतले वन्य प्राण्यांविषयी धडे

या बॅनरवर भावी खासदार असा आशय देखील लिहिण्यात आलाय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे शहराचं नेतृत्व वसंत मोरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिळणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. पुणे लोकसभेसाठी मनसेची चाचपणी सुरू आहे.

पुणे लोकसभेसाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. जर पुणे लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली तर नक्कीच आम्ही पुणेकरांचे प्रश्न सोडवू आणि पुणेकर भरभरून प्रेम करतील असा विश्वासही त्यांनी (Pune) व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.