Dehuroad : ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी साधला शीख बांधवांशी संवाद
संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत देहूरोड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार ) गटाचे अध्यक्ष मिकी कोचर, कार्याध्यक्ष महेश केदारी, समीर सतेलु, कैलास गोरवे, शिवाजी दाभोळे, रेणू रेडी, महिला अध्यक्षा बॉबी डीका, देहूरोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष भरत नायडू, रमेश जाधव, मावळ तालुका शिवसेना सल्लागार विशाल दांगट पाटील, युवासेना मावळ तालुका सरचिटणीस राजू शेलार उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात तुल्यबळ लढत होत असून या दोघांमध्ये कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.