Pune : सहकारनगरमध्ये दारूच्या नशेत एकाच्या पोटात खुपसला चाकू

एमपीसी न्यूज : पुण्याच्या सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका 32 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. पुणे सातारा रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानात हा संपूर्ण प्रकार घडला. सहकारनगर (Pune) पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

निसार शेख (वय 56) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समीर हुसेन काजी (वय 32 या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे दारू पिण्यासाठी देशी दारूच्या दुकानावर गेले होते. यावेळी त्या ठिकाणी त्यांच्या तोंड ओळखीचा आरोपी निसार शेख हा देखील त्या ठिकाणी आला होता. यावेळी दोघात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.

 

फिर्यादीने रागाच्या भरात आरोपीच्या गालात चापट मारली. त्यानंतर आरोपीने त्याच्याजवळ चाकू फिर्यादीचा पोटात खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.