Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत.

Pune : सहकारनगरमध्ये दारूच्या नशेत एकाच्या पोटात चाकू खूपसला

इर्शाळवाडी गावात 228 जण राहतात. त्यात सहा वर्षाखालील 25 मुले आहेत. दरड कोसळण्याची घटना घडत असताना 70 जण सुरक्षित ठिकाणी गेले. दरम्यान अनेक घरे दरडीखाली सापडली. दरडीखाली अडकलेल्या 80 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जात असून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत 21 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी जेसीबी सारखे यंत्र जाऊ शकत नसल्याने नागरिकांच्या मदतीने ही दरड हटविण्यात येणार आहे. सुमारे 650 जण या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. हा परिसर अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्याने तिथे जाण्यासाठी देखील अनेक अडचणी येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.