Hinjawadi : हिंजवडीतील मोबाईल शॉपमधून तीन लाखांचे मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज : हिंजवडी येथील एका मोबाईल (Hinjawadi) शॉपमधून सुमारे तीन लाख रुपयांचे 42 मोबाईल चोरून नेले आहेत. हि चोरी गुरुवारी (दि.22) व शुक्रवारी (दि.23) या कालावधीत शिवाजी चौक येथील बालाजी एन्टरप्रायजेस या दुकानात घडली आहे.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलनसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानातून चोरट्याने रेडमी, वन प्लस, सॅमसंग अशा कंपनीचे 2 लाख 93 हजार 600 रुपयांचे 42 मोबाईल हँडसेट चोरून नेले आहेत.

यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pune : दोन पिढ्यांची अनोखी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आठवणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.