Pune Rain : पावसाची पुण्यात दमदार हजेरी; मान्सूनच्या आगमनाने पुणेकर सुखावले

एमपीसी न्यूज : उन्हाच्या झळा सहन केल्यानंतर (Pune Rain) अखेर पावसाने पुण्यात हजेरी लावत पुणेकरांना दिलासा दिला आहे. गेले काही महीने पुण्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. हा खेळ आता संपून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हा अवकळी पाऊस नसून मान्सून असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. 

पुणे शहरात सकाळी 7 वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने 24 जून पासून पाऊस सुरू होणार असा अंदाज वर्तवला होता. त्या प्रमाणेच आज उपनगर भागात तसेच शहरातल्या कात्रज, सिंहगड रोड, बाळजीनागर, सहकारनगर, सदाशिव पेठ आणि अन्य शहरतल्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

26 जून ते 1 जुलैपर्यंत मुळशी, ताम्हिणी, खंडाळा, माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून अतिवृष्टी अपेक्षित आहे.

पुण्यासोबतच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथेही पावसाने हजेरी (Pune Rain) लावली आहे. राज्यात पाणीसाठाही आटला होता. अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली होती. पण आता पावसाच्या आगमनाने सर्वच जण सुखावले आहेत.

Hinjawadi : हिंजवडीतील मोबाईल शॉपमधून तीन लाखांचे मोबाईल चोरीला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.