Rain News : पुढील 48 तासात महाराष्ट्रासह 11 राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशासह (Rain News) राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अनेक राज्यांमधून थंडी कायमचीच गायब होईल. हवामानात बदल होत असतानाच पुढील 3 ते 4 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.

आयएमडी च्या अंदाजानुसार,उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस होईल. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीसह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Pune Fire News : पुण्यात काल आगीच्या तीन घटना, सुदैवाने जीवीतहानी नाही

याशिवाय उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, (Rain News) बिहार आणि ओडिशाच्या विविध भागात 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान गडगडाट आणि विजांचा कडकडाटसह गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.