Pune : पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न म्हणत रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या मैदानात?

एमपीसी न्यूज : पुण्यातून (Pune) आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. ‘धंगेकर पॅटर्न’ म्हणत धंगेकारांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे धंगेकर निवडणुकीच्या दृष्टीने तयारीनिशी मैदानात उतरल्याची चर्चा समोर आली आहे. 

पुन्हा येतोय! ‘धंगेकर पॅटर्न’ प्रदूषणमुक्त होण्यासाठी… पुन्हा येतोय! ‘धंगेकर पॅटर्न’ भयमुक्त पुण्यासाठी…अशा आशयाचे (Pune) पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट होताना दिसत आहेत. पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी रवींद्र धगेकरही इच्छुक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.