Maval : वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळ मधील पहिली सनदी लेखापाल होण्याचा मान

पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश

एमपीसी न्यूज – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर (Maval) महिन्यात घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये टाकवे बुद्रुक येथील वेदांगी असवले हिने आंदर मावळ मधील पहिली सनदी लेखापाल (सीए) होण्याचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत वेदांगी हिने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशामुळे तालुक्यातील सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मागील वर्षी देशभरातून 32 हजार 907 विद्यार्थी सनदी लेखापालच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अवघे 9.42 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात वेदांगी हिला 800 पैकी 495 गुण मिळाले आहेत.

Pune : पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न म्हणत रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या मैदानात?

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तुकाराम असवले व हभप सुभाष असवले यांची पुतणी आणि मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण असवले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बु. मुख्याध्यापिका वंदना नारायण असवले या शिक्षक दाम्पत्याची सुकन्या वेदांगी असवले हिने सी. ए. परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून टाकवे बुद्रुक व असवले परिवाराचे (Maval) नाव भारतात पोहोचवले.

वेदांगीने सातत्यपूर्ण अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात उज्ज्वल यश प्राप्त केले. मावळ तालुक्यातील आदर्श शिक्षक नारायण असवले व वंदना असवले यांनी वेदांगीने जीवन सार्थक करून दाखवल्याची भावना व्यक्त केली.

टाकवे बुद्रुक गावातील ग्रामस्थ, नातेवाईक,शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी वेदांगी व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर-धाराशिव मावळ मित्र मंडळ आणि मावळ तालुक्यातील माध्यमिक,प्राथमिक शिक्षक संघटना,पतसंस्था पदाधिकारी,शिक्षक स्टाफ,अधिकारी मित्रपरिवार,नातेवाईक,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी इत्यादींकडून वेदांगीचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.