PMC Mock Drill : जागतिक आपत्ती दिनानिमित्त अग्निशमन दलाकडून यशस्वीरित्या पार पडले मॉकड्रील

एमपीसी न्यूज: संध्याकाळी 5ची वेळ.. महानगरपालिकेत एक मोठ्ठा आवाज होतो आणि आग लागते. अग्निशमन दलाला पाचारण करताच दोन फायर टेंडर, एक रेस्क्यू व्हॅन, एक देवदूत वाहन, हायड्रॉलिक वाहन प्लॅटफॉर्म व दोन रुग्ण वाहिका घटनास्थळी पोहोचताच कार्यवाही सुरू होते.

यामध्ये जवान आग विझविण्याचे काम करतात. तर दुसरीकडे चौथ्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या जखमी नागरिकांना सुखरूप बाहेर काढतात. सिलेंडरच्या मदतीने पूर्ण आग विझवतात. संपूर्ण इमारत कोणत्याही प्रकारची इजा न होता केवळ आठ मिनिटांत रिकामी केली जाते.

आज दि. 13 ऑक्टोबर रोजी जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून संयम. 5 वा पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रील आयोजित केले होते. यावेळी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतेही कल्पना नसल्याने एकच धांदल उडाली होती.

जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त या मॉक ड्रील मध्ये महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष विभाग व त्यांचे प्रमुख गणेश सोनूने आणि सुरक्षा विभाग व त्यांचे प्रमुख राकेश बिटकर यांच्या सहकार्याने हे कार्य पार पडले. प्रत्यक्ष अशी काही घटना घडली तर आपण सुसज्ज आहोत आणि परिस्थितीला कसे तोंड देऊ शकतो यांचे हे प्रात्यक्षिक होते. ही घटना अचानक घडल्यामुळे झालेल्या गोंधळासाठी विभागाने दिलगिरी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.