Mock drill : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी मधील चाकण चौकात पोलीस प्रशासनाचे माॅक ड्रील

एमपीसी न्यूज : आळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने चाकण चौकात माॅक ड्रील करण्यात आले. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेच्या (Mock drill) अनुषंगाने आळंदी शहरात बहुसंख्य जनसमुदाय एकत्र येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चाकण चौक येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली होती.

दिनांक 14 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी 5 .27 वा. ते 6.10 वा. च्या दरम्यान आळंदी मधील चाकण चौकात माॅक ड्रील करण्यात आले.संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा चे अनुषंगाने आळंदी शहरात बहुसंख्य जनसमुदाय एकत्र येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चाकण चौक येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली होती.

Bhima river : भीमा नदीला मिळणाऱ्या 9 नद्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यशाळा

सदर ठिकाणी भोसरी एमआयडीसी, चाकण, दिघी, म्हाळुंगे पोलिस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी हजर झाले होते. दंगा नियंत्रक पथक व पोलिसांनी दंग्यावर नियंत्रण (Mock drill) आणण्याची विविध प्रात्यक्षिके येथे करून दाखवली.या माॅक ड्रील मध्ये पीआय रमेश पाटील,पीएसआय जोंधळे साहेब,पीएसआय विद्या माने ,पोलिस कर्मचारी, आळंदी अग्निशमन दल कर्मचारी सहभागी झाले होते.याबाबत माहिती पो. आ. जालिंदर जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.