Bhima river : भीमा नदीला मिळणाऱ्या 9 नद्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यशाळा

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत नमामी चंद्रभागा आणि चला जाणूया नदीला या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमासाठी भीमा नदीला (Bhima river) मिळणाऱ्या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, रामनदी, भीमा, घोडनदी, मीनानदी, वेळगंगा या नऊ नद्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.

सदर चर्चेमध्ये मुख्यत्वे नदीला होणारे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकची समस्या, तसेच जनजागृती, स्थानिक नागरिकांच्या पाणी समस्या आणि इतर नद्यांवरील काम, त्यांच्या कामाची देवाणघेवाण यावर चर्चा झाली.आजच्या झालेल्या कार्यशाळेत रोटरी क्लब वाल्हेकरवाडी ते पवना नदी संवर्धन अभियानांतर्गत किवळे नाला प्रकल्प हा तयार केलेला पायलट प्रोजेक्ट पथदर्शी असल्याकारणाने त्यावर प्रकर्षाने भरपूर चर्चा झाली आणि सर्वांनी या कामाचे कौतुक करत जास्तीत जास्त माहिती जाणून घेतली.

Ajit Pawar : विरोधकांचा आवाज अशापध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब- अजित पवार

चर्चेनंतर नदी यात्रेसाठी प्रत्येक NGO आणि कार्यकर्त्यांना जल कलश, नदी बॅनर आणि राष्ट्रीय ध्वज देऊन सन्मानित करण्यात आले.(Bhima river) सदर कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व नद्यांचे विविध प्रतिनिधी, जलबिरादरी टीम आणि महाराष्ट्र  शासनातर्फे आळंदी नगरपरिषद आयुक्त आणि सहसंचालक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.