Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेनिमित्त वारकरी भाविकांकडून राहुट्या मंडप उभारणीला सुरुवात

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (Sanjivani Samadhi Ceremony of Shri Dnyaneshwar Maharaj) व कार्तिकी यात्रेनिमित्त (Kartiki Yatra) आळंदी मध्ये ठिकठिकाणी वारकरी भाविकांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने सप्ताहाच्या सोहळ्यासाठी प्रशस्त मंडप उभारण्यात आले आहेत. तर कुठे मंडप उभारण्याचे काम चालू आहे. तसेच ठिकठिकाणी वारकरी भाविकांच्या राहण्याकरिता राहुट्या उभारण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी ते पूर्ण झालेले दिसून येत आहे. काही ठिकाणी मोठी वाहने वारकऱ्यांसह जीवनावश्यक वस्तू घेऊन धर्मशाळेत दाखल होत आहेत.

Mock drill : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी मधील चाकण चौकात पोलीस प्रशासनाचे माॅक ड्रील

ज्ञानोबा माऊलींच्या, हरिनामाच्या गजरात काही दिंड्या हळूहळू शहरात दाखल होत आहेत.कार्तिकी यात्रेनिमित्त काही व्यापारी तात्पुरती दहा बारा दिवसांकरीता आपल्या दुकानांसाठी मंडप व्यवस्था करताना दिसून येत आहेत. इंद्रायणी नदी घाटावर सुध्दा पवित्र इंद्रायणी नदीत स्नानाकरिता वारकरी भाविकांची हळूहळू गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे.वारकरी भाविकांसाठी शौचलये आणण्यात आले असून त्याची किरकोळ दुरुस्तीची कामे नदीपलीकडील बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत प्रशासनाकडून सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.