Kartiki Yatra Traffic : कार्तिकी यात्रेमुळे देहू व आळंदीत वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : कार्तिकी यात्रेमुळे देहू व आळंदीसहित (Kartiki Yatra Traffic) आसपासच्या परिसरात 16 ते 23 नोव्हेंबरसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक यात्रा अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी तसेच 22 नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात सुमारे सहा ते सात लाख भाविक संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (माऊलींच्या) दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे आळंदी येथील माऊली मंदिरातून दर्शन बारी सुरू होऊन ती देहू फाटापर्यंत दर्शन भारीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरिता सतीश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक अतिरिक्त कार्यभार पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड शहर यांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

दिघी-आळंदी/देहू रोड/तळवडे/चाकण वाहतूक विभाग अंतर्गत वाहतुकीत बदल –

मोशी चौकीतून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग –

1) जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे पुढे जाणे

2) भोसरी आळंदी रोडने मॅगझीन चौक मार्गे पुढे जाणे

3) मोशी- चाकण ते शिक्रापूर मार्गे पुढे जाणे

भारतमाता चौक मोशी येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

Wakad Playground : कुणी क्रीडांगण देता का क्रीडांगण? वाकडमधील मुले व युवकांची आर्त हाक

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग – 

1) जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे पुढे जाणे

2) भोसरी आळंदी रोडने मॅगझीन चौक मार्गे पुढे जाणे

3) मोशी- चाकण ते शिक्रापूर मार्गे पुढे जाणे

चिंबळी फाटा चौक चाकण येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग – Kartiki Yatra Traffic

1) जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे पुढे जाणे

2) भोसरी आळंदी रोडने मॅगझीन चौक मार्गे पुढे जाणे

आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग –

1) जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे पुढे जाणे

2) भोसरी आळंदी रोडने मॅगझीन चौक मार्गे पुढे जाणे

चाकण वडगाव घेनंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग –

1) कोयाळी कमान, कोयाळी मरकळ गाव मार्गे पुढे जाणे

पुणे – दिघी मॅगझीम चौकाकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग – Kartiki Yatra Traffic

1) भोसरी आळंदी रोडने मॅगझीन चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी जाणे

2) जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे पुढे जाणे

मरकळ करून धानोरे फाट्या मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग –

  1. धानोरे फाटा – चऱ्होली फाटा, मॅगझिन चौक/ अलंकापुरम चौक मार्गे पुढे जाणे

पुण्याकडून आळंदीकडे जाणारी वाहनांना काळे कॉलनी, तापकीर चौक, चऱ्होली फाटा या पुढे जाण्यास प्रवेश बंद असणार आहे.

देहू कमान (जुना मुंबई पुणे हायवे) येथून देवगावकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

याप्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ते 23 नोव्हेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांना (दिंडीतील वाहने व अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.

जड वाहनांना प्रवेश बंदी –

1. तळेगाव चाकण रोडवरील देहू फाटा येथून देहूगावकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग – चाकण तळेगाव रोडवरील एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

2. महिंद्रा सर्कलकडून आयटी पार्क/कॅनबे चौक येथे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग – महिंद्रा सर्कलकडून निघोजे ते मोई फाटा मार्गे इच्छित स्थळी जाणे.

याप्रमाणे 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा ते रात्री 7 वाजेपर्यंत देहूकडे (Kartiki Yatra Traffic) जाणाऱ्या सर्व जड वाहनांना (दिंडीतील वाहने व अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून प्रवेश बंदी करण्यात आलेली असून) त्याप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.