Alandi News : कार्तिकी यात्रेनिमित्त अलंकापुरीमध्ये लाखो भाविकांचे आगमन

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा (Alandi News)व कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी भक्त आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदी घाट दुतर्फा पूर्णपणे भाविक वारकऱ्यांनी भरून गेला आहे. पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी येथे झाली आहे.

पालिका प्रशासनातर्फे इंद्रायणी घाटावर महिलांसाठी चेजिंग रूम व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्रात दुर्घटना घडू नये, याकरीता आपत्ती व्यवस्थापन व एन डी आर एफ टीम इंद्रायणी नदी पात्रात बोटीसह सज्ज होती.

वैतागेश्वर मंदिराशेजारील (नदीपलीकडील) दर्शनबारी पूर्णपणे भरली असून तिची रांग बाहेर आराधना हॉटेलच्या पुढे गेली होती. इंद्रायणीच्या घाटावरती टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊलींच्या नामघोषात भाविक वारकरी (Alandi News)येत आहेत.

Pune News : ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याला आवश्यक निधी देऊ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

डोक्यावर श्री विठ्ठल मूर्ती, संत ज्ञानेश्वर महाजांची मूर्ती, श्री ज्ञानेश्वरी, तुळशी वृंदावन, खांद्यावर पताका असे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे. प्रदक्षणा रस्ता, वडगांव रस्ता, चाकण इ.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसत आहे. तसेच विश्रांतवड येथे (संत ज्ञानेश्वर व चांगदेव भेटीस्थान) वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.