Alandi : कार्तिकी यात्रेसाठी आलेले वारकरी आता परतीच्या मार्गावर

एमपीसी न्यूज – अलंकापुरीमध्ये कार्तिकी यात्रा व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडला (Alandi) असून राज्यभरातून व परराज्यातून आलेल्या वारकरी भाविकांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे.

Chinchwad : चष्मा वेळेवर दिला नाही म्हणून मित्रानेच केली बांबूने मारहाण

या परतीच्या प्रवासावेळी एसटी स्टॅण्डवर , शहरातील रस्त्यावर मोठी गर्दी दिसून येत होती. कोणी एस टी ने , कोणी खासगी छोट्या मोठ्या वाहनातून तर कोणी पायी दिंडीने आपला परतीचा प्रवास करताना दिसून येत होते.

 

कार्तिकी यात्रेनिमित्ताने वारकरी  दुकानांमधील   प्रासादिक साहित्य, खेळणी, कपडे व संसारोपयोगी वस्तू  खरेदी करून ते त्यांच्यासोबत नेताना दिसून येत (Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.