Pimpri News : गुटखा साठवून ठेवणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या गुटखा साठवून (pimpri News) ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.18) पिंपरी गाव येथे केली आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई विकास जनार्दन रेड्डी (वय 28 रा.पिंपरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुर्यकांत राजेंद्रप्रसाद पांडे (वय 29 पिंपरी गाव) याला अटक करण्यात आली आहे.

Alandi News : कार्तिकी यात्रेनिमित्त अलंकापुरीमध्ये लाखो भाविकांचे आगमन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्या (Pimpri News) टपरीमध्ये त्याने 17 हजार 142 रुपयांचा गुटखा साठवून ठेवला होता. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला एटक केले व त्याच्याकडून 1 हजार 170 रुपये रोख 5 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 23 हजार 312 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.