Pimpri News : किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीबांना अन्नदान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक (Pimpri News) अध्यक्ष किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज (दि.19) गरीबांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते तुषार शिरोडे, ऋषिकेश सरोदे, महेश पवार तसेच निलेश माहुलकर (श्री वैष्णवी हॉटेलचे मालक) व अजिंक्य बोंदार्डे आदी उपस्थित होते.

Pimpri News :गुटखा साठवून ठेवणाऱ्या तरुणाला अटक

किशोर आवारे हे दरवर्षी दिवाळीला व इतर वेळीही सर्व आदिवासी भागातील नागरिकांना फराळ व अन्नधान्याचे वाटप करतात. जनतेला ते जमेल त्या पद्धतीने सतत मदत करतात. त्यांच्या कामात कधी खंड येऊ नये यासाठी व गोरगरीबांचे त्यांना आशीर्वाद मिळावेत यासाठी हे अन्नदान करण्यात आले.

याविषयी बोलताना प्रदीप नाईक म्हणाले की, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सांगू इच्छितो की, ते त्यांचे काम खूप मन लावून करतात.  आवर्जून सांगण्यासारखे आहे की, भाऊ कमी बोलून जास्त काम करतात. तसेच आज एवढ्या मोठ्या पदावर असताना कुठल्याही पदाचा त्यांना गर्व, त्यामुळेच त्यांना नुकताच समाज भूषण हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे.

किशोरभाऊ आवरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी जे काही आज जनतेसाठी काम केलेले आहे याचे पुण्य त्यांना लाभावे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करेन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.